भांडुप टेंभीपाडा येथील ब्रिमस्टोवर्ड प्रकल्पाअंतर्गत रुंदीकरण करण्यात येणार्या नाल्याच्या आराखड्यातील शब्दांच्या फेरबदलामुळे तानसा पाइपलाइन येथील नालाकाम सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवर्यात सापडला आहे.
वैभव चौकाजवळ या नाल्यावर स्लॅब टाकून विकासकाला नाला वापरासाठी परवानगी देण्यात आल्याने नाल्याच्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती रतन बोस यांनी मागविली. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीत ब्रिमस्टोवर्ड प्रकल्पाअंतर्गत काढलेल्या आराखड्यानुसार या नाल्याच्या रुंदीकरणासाठी पाच मीटर जागेची तरतूद करण्यात आली.
मात्र झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत या नाल्यालगत बांधण्यात येत असलेल्या इमारतीला दिलेल्या रिमार्कमध्ये ‘हक्क दिला’ करून ५ मीटर रस्ता रुंदीकरण प्रस्तावाला परवानगी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार शब्दांचा फेरफार झाल्याचा आरोप बोस यांनी केला आहे. तसेच हा नाला असर्वेक्षित असल्याचा खुलासा देण्यात आल्याने ब्रिमस्टोवर्ड अतंर्गत होत असलेल्या नालाकामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची लेखी मागणी बोस यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
No comments:
Post a Comment