मुंबई : किशोरवयीन मुलींमधील पोषक आहाराअभावी उद्भवणारा रक्तक्षय रोखण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून रक्तक्षय असलेल्या मुलींना लोहयुक्त गोळ्या देण्याच्या अभियानास बुधवारपासून सुरुवात झाली आहे.
पोषक आहार व आरोग्याची काळजी या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे झोपडपट्टय़ांमधील किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय आढळून येतो. वेळीच यावर उपचार न केल्यास युवती आणि भावी मातांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. रक्तक्षयाचा परिणाम प्रसूती, नवजात शिशू यांवरही होऊ शकतो. मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत हेल्थ पोस्ट आणि महापालिका शाळांमधून पोषक आहाराअभावी रक्तक्षय नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्यात येत आहे. गेल्या वर्षी महापालिका शाळांमधील 42 हजार विद्यार्थिनी तसेच आरोग्य विभागांतर्गत हेल्थ पोस्टच्या माध्यमातून 13 हजार शाळाबाह्य मुली आणि 82 हजार 902 गर्भवती महिलांना रक्तक्षय प्रतिबंधाचे उपचार देण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment