मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेना भाजपची १७ वर्षे सत्ता असून पालिकेमध्ये मागासवर्गीयांची १९ हजार पदे रिक्त असतानाच महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेत राज्य करणाऱ्या व मागासवर्गीयांचे आम्हीच तारण हर आहोत असे दाखवणाऱ्या काँग्रेस , राष्ट्रवादी च्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागासवर्गीयांची मोठ्याप्रमाणात मंत्रालायामधील पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांना दिलेल्या माहितीत मंत्रालयामध्ये ५९३ पदे रिक्त असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
निवडश्रेणी लाघुलेखकाची ४१ पदे मंजूर असून अज २, भज (क )२ पदे रिक्त आहेत. उच्च श्रेणी लघुलेखकाची २३९ पदे मंजूर असून सरळसेवा भार्तीद्वारे ११९ तर पदोन्नतीद्वारे १२० पदे मंजूर आंहेत त्यापैकी सरळसेवा प्रकारातील अजा ५, अज ५, विजा (अ) ३, भज (क )२, इमाव ७ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीद्वारे लघुलेखकांची अज ८, विजा (अ ) ४, भज (ब )१, भज (क ) ४ पदे रिक्त आहेत.
निम्नश्रेणी लघुलेखकांची २६९ पदे मंजूर असून त्यापैकी सरळसेवा द्वारे १३४ व पदोन्नती द्वारे १३५ पदे मंजूर आहेत. सरळसेवा प्रकारातील अजा ९, अज ५, विजा (अ) ४, भज (ब )३, भज (क )२, भज (ड)३, इमाव १४ पदे रिक्त आहेत. पदोन्नत प्रकारातील अजा १२, अज ९, विजा (अ) ४, भज (ब ) ३, भज (क ) ५, भज (ड) २ पदे रिक्त आहेत.
लघु टंक लेखकांची १११ पदे मंजूर असून त्यापैकी सरळसेवेद्वारे ८८ तर पदोन्नती द्वारे २३ पदे भरावयाची होती त्यापैकी सरळसेवेतील अजा ८, अज५, विजा (अ ) ३, भज (क ) २, इमाव ८ पदे रिक्त आहे. तर पदोन्नतीद्वारे अजा ३, अज २, विजा(अ ) १, भज (ब )१, भज (क )१ पदे रिक्त आहेत.
तर लिपिक टंक लेखकांची १९७४ पदे मंजूर असून सरळ सेवेद्वारे १४८० तर पदोन्नतीद्वारे ४९४ पदे भरावयाची होती त्यापैकी सरळसेवेतील अजा ३७, अज ३८, विजा (अ) १४, भज (ब ) ८, भज (क ) २४, भज (ड ) १२, इमाव ५५ पदे रिक्त आहेत. तर पदोन्नतीद्वारे अज १९, विजा (अ ) ११, भज (ब ) ५, भज (क ) ९ पदे रिक्त असल्याचे कळविले आहे.
No comments:
Post a Comment