मुलुंडमधील झोपडपट्टी स्थानिकांनी उठवली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2013

मुलुंडमधील झोपडपट्टी स्थानिकांनी उठवली

मुंबई : मुलुंडमधील नीलमनगर परिसरात एका रात्रीत उभी राहिलेली झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली. विशेष म्हणजे स्थानिकांबरोबर सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी या कारवाईत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कारवाईत सहभागी झालेल्या नागरिकांना पोलिसांनी अटक केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. नीलमनगर परिसरात महसूल खात्याचे साडेसहा लाख चौरस मीटरचे तीन प्लॉट्स आहेत. मात्र अचानकपणे एका रात्रीत या प्लॉट्सवर काही झोपडय़ा उभ्या राहिल्या. साडय़ांच्या सहाय्याने सीमारेषा आखत काही महिलांनी या जागेचे वाटपही सुरू केले होते. स्थानिक राजकीय पक्ष आणि समाजसेवी संस्थेने या अनधिकृत झोपडय़ांविरोधात अनेक तक्रारी देऊनसुद्धा मनपाकडून कारवाई होत नव्हती. अखेर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, भाजपा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून या झोपडय़ा स्वत: तोडल्या, काही झोपडय़ांना आग लावून या झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. अशा पद्धतीने अनधिकृत झोपडपट्टी उभी राहिल्यामुळे संपूर्ण शहर विद्रुप होते. यावर मनपाने लगेच कारवाई करायला हवी; परंतु असे होत नाही म्हणून आम्हाला असे आंदोलन करावे लागले, असे आंदोलकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad