राजकीय आरक्षण नको - आनंदराज आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 January 2013

राजकीय आरक्षण नको - आनंदराज आंबेडकर

लातूर : भारतीय राज्य घटनेत मागासवर्गीयांना दिलेले राजकीय आरक्षण नको, या भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी समर्थन केले आहे.

मंगळवारी लातुरात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की सार्वजनिक चळवळीत काम करणार्‍याला या राजकीय आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. राखीव जागेवरुन जो निवडून येतो, त्याचा समाजाशी, चळवळीशी संबंध नसतो. राखीव जागेचे हे मोठे अपयश आहे. जेंव्हा रिपाइंचे एकत्रिकरण झाले होते, तेव्हा खुल्या मतदारसंघातून रिपाइंचे चार खासदार निवडून आले होते, असे त्यांनी सांगितले. साहित्यिक आशिष नंदी यांनी केलेल्या वक्त्यव्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, की आशिष नंदी यांनी असे विधान करुन वाद ओढावून घेतला आहे. समाजशास्त्राच्या विद्वानाने असे विधान करणे दुर्देवी आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad