बेस्टचा अर्थसंकल्प उज्ज्वल भविष्य देणारा असेल अशी अपेक्षा होती, मात्र याबाबत भ्रमनिरास झाला आहे. मुंबईकर प्रवाशांची निराशा करून त्यांच्यावर भाववाढीची टांगती तलवार ठेवून आपण दिवाळी साजरी करत असल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी केली.सत्ताधार्यांकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याने बेस्ट उपक्रम खिळखिळा झाला आहे. सत्ताधार्यांचा प्रशासनावर वचक राहिला नाही. सत्ताधारी पक्ष या उपक्रमाकडे सोन्याची अंडी देणारी कोबंडी म्हणून पाहत आहे. शिलकीचा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी मृगजळ आहे. मुंबईत भविष्यात मेट्रो, मोनो रेल्वेमुळे बेस्टसमोर आव्हान उभे राहणार आहे. याबाबत कोणतीही तरतूद किंवा नियोजन अर्थसंकल्पात नाही. बेस्ट उपक्रमाची पालिका पालक संस्था आहे. तरीही पालिकेने 10 टक्के व्याजदराने बेस्टला कर्ज दिले आहे. पालिकेने अशा प्रकारे सावकारीचा व्यवसाय करू नये, अशी सूचना या वेळी निकम यांनी केली.
परिवहन विभागाचा तोटा परिवहन शुल्क म्हणून वसूल करण्यास राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी विरोध दर्शवला.बेस्टची परिवहन सेवा उपनगरातही पुरवली जात असताना त्याचा भुर्दड फक्त शहरातील नागरिकांच्या डोक्यावर टाकणे योग्य नसल्याचे पिसाळ यांनी सांगितले. प्रस्तावित अर्थसंकल्प, सुधारित अर्थसंकल्प, प्रत्यक्षातील उत्पन्न आणि खर्चाचे आकडे पाहिले तर सत्ताधार्यांनी मुंबईकरांची फसवूणक केली असल्याचा आरोप मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी केला.
No comments:
Post a Comment