माहिममध्ये झोपडपट्टीला भीषण आग / सहा जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 January 2013

माहिममध्ये झोपडपट्टीला भीषण आग / सहा जणांचा मृत्यू



माहिममधील नयानगर या झोपडपट्टीत भल्या पहाटेपासून आगीच्या तांडवाने हाहाकार माजवला असून प्राथमिक माहितीनुसार जवळपास १५० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत गंभीररीत्या भाजलेल्या सहा जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

रहेजा रुग्णालयाजवळ ही झोपडपट्टी असून पहाटे लोक गाढ झोपेत असतानाच ५.१५ च्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रुद्र रुप धारण केले आणि एकच हाहाकार उडाला. संपूर्ण झोपडपट्टीला आगीचा वेढा पडला असून आतापर्यंत १५० झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.

नयानगरमधील आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचे जवळपास ३० बंब व जवान तेथे पहाटेपासून आहेत. तेथे पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. या आगीत गंभाररीत्या भाजलेल्या सहा जणांना जवळच्या भाभा व सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आणखीही काही लोक जखमी असून मृतांचा आकडा वाढू शकतो, असे अग्निशमन दलाने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad