मुलुंड पूर्व येथील नीलमनगर परिसरातील अनधिकृत झोपड्यांच्या विरोधात रविवारी सर्वपक्षीय आंदोलन करून जाळपोळ केल्याप्रकरणी मुलुंड नवघर पोलिसांनी आज (मंगळवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार शिशिर शिंदे, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार सरदार तारासिंग यांच्यासह १७ जणांना अटक केली.
पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, शाखाप्रमुख सुभाष पाटकर, शिवसेनेचे महेंद्र वैती, कॉंग्रेसचे गौतम जैन व कैलास पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जनार्दन महाडिक, रवींद्र सावंत, देवेंद्र सावंत आणि मनसेचे अनिल मोगरे यांना अटक केली होती.
विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यामुळे मुलुंडमधील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश गायकवाड यांनी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले होते; तर आमदार शिशिर शिंदे म्हणाले होते, की झोपडपट्ट्या वाढण्यास मुलुंड पोलिस, पालिका प्रशासन आणि तहसीलदार कार्यालय यांचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. त्यांचे पाप लपविण्यासाठी ही राजकीय धरपकड करण्यात आली आहे. मुळात येथे झोपड्यांसाठी जागा अडविणाऱ्यांना ज्यांनी फूस लावली, त्या भागवतबाई, भारती सहानी आणि कछू यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई का केली नाही? यासाठी पैशांचाही व्यवहार त्यांनी केला आहे. पोलिस उपायुक्त घुर्ये यांच्याविरोधात आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्याची सांगत त्यांनी वस्तुतः सरकारची लाखो रुपयांची जमीन आंदोलकांनी वाचविल्याबद्दल सरकारने आंदोलकांचा सत्कार करायला हवा, असेही शिंदे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment