मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर बांधकामविरहित स्मृती चौथरा उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी बुधवारी सांगितले. शिवाजी पार्क येथे प्रबोधन स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनसमयी आयुक्त बोलत होते. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बेस्टमध्ये अनुकंपा तत्त्वावरील पाच जणांना याबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
मुंबई पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत बाळासाहेबांचा बांधकामविरहित स्मृती चौथरा उभारण्याचे एकमत झाले होते. त्या अनुषंगाने बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त येत्या महिन्यात पालिकेतर्फे त्वरित काम हाती घेण्यात येणार आहे. बाळासाहेबांचा हा बांधकामविरहित चौथरा येत्या दोन महिन्यांत बांधून पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्त कुंटे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या वेळी बेस्टमध्ये पाच जणांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीपत्र देण्यात आले. किशोरी सपकाळ, सुधा तिवारी, शोभादेवी सिंग यांच्या पतीचे सेवेत असताना निधन झाले होते, तर सिद्धेश राणे आणि अल्तमस शेख यांच्या वडिलांचे सेवेत निधन झाले होते.
Post Top Ad
24 January 2013
Home
Unlabelled
बाळासाहेबांचा बांधकामविरहित स्मृती चौथरा - आयुक्त
बाळासाहेबांचा बांधकामविरहित स्मृती चौथरा - आयुक्त
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment