कामराज नगर मध्ये २ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण
मुंबई / अजेयकुमार जाधव
घाटकोपर पूर्व येथील जुनी रमाबाई सहकार नगर (कामराज नगर) हि वसाहत ५० वर्षापूर्वी वसलेली आहे. हि वसाहत निर्माण झाल्यापासून असलेली रहिवाश्यांची घरे व बौद्ध धर्मीयांची धार्मिक स्थळे विकसकाने अपात्र असल्याचे कारण देवून पुनर्वसन करण्यास नकार दिल्याने २ फेब्रुवारी पासून उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती पंचशील बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष राम तुपेरे यांनी दिली आहे .
जुनी रमाबाई सहकार नगर वसाहत पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असून या वसाहतीला कामराज नगर आर. टी. ओ. या नावानेही ओळखले जाते. सदर वसाहत बनल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, पंचशील बुद्ध विहार, त्रिरत्न बुद्ध विहार आणि लुम्बिनी बुद्ध विहार अशी बौद्ध धर्मीयांची धार्मिक स्थळे बांधण्यात आली होती.
या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यात येत असून विकासक आर्यमन डेव्हलपर्स यांनी येथील धार्मिक स्थळांचे पुनर्वसन करण्यास नकार दिला आहे. तसेच येथील २५०० झोपडीधारकांपैकी १३०० झोपडीधारकांनाच पात्र ठरवले आहे. या १३०० पात्र झोपडपट्टी धारकांपैकी कित्तेक लोकांची खोटी कागदपत्रे स्थानिक कमिटीने सादर केली असल्याचा आरोप राम तुपेरे यांनी केला आहे.
विकासक झोपडीधारकांवर अन्याय करत असतानाच येथील बौद्ध धर्मीयांची धार्मिक स्तःळे सुद्धा बांधून देण्यास तयार नसल्याने पंचशील बुद्ध विहार समितीच्या नेतृत्वा खाली २ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजल्यापासून पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे असल्याचे पंतनगर पोलिस ठाण्याला कळवण्यात आले आहे.
झोपडीधारकांवर झालेला अन्याय व विकासकाकडून होत असलेली फसवणूक याबाबत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन देवून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली असल्याचे तुपेरे यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment