अंध व्यक्तींनाही रेल्वेच्या सुविधांबाबत अधिक माहिती मिळावी व त्यांचाही प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे मंत्रालयाने आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यात ब्रेल लिपी असलेले स्टिकर्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्याने अधिक माहिती देताना सांगितले की, आज देशातील सर्वात अधिक व सुरक्षित प्रवासाची वाहिनी म्हणून ओळखली जाणार्या रेल्वे मंत्रालयाने आता देशातील अंध व अपंग व्यक्तींनाही अधिक सुरक्षित व सुखकर प्रवास करता यावा यासाठी रेल्वेच्या प्रत्येक कोचमध्ये अंधांसाठी खास ब्रेल लिपी असलेली स्टिकर्स लावण्याची घोषणा केली आहे. याशिवाय अपंग व्यक्तींनाही अधिक सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी खास बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या 2013-2014 या सत्राच्या बजेटमध्ये यासाठी खास तरतूद करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाने देशातील कोटय़वधी अंध व अपंग व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे.
No comments:
Post a Comment