विकास आराखड्यासाठी हरकतींसाठी मुदतवाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 January 2013

विकास आराखड्यासाठी हरकतींसाठी मुदतवाढ

मुंबई- नवा विकास आराखडा तयार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या भू-वापर नकाशातील 600 चुका निदर्शनात आल्या आहेत; तसेच याबाबत हरकती आणि सूचना पाठविण्यातही अडचणी येत असल्याचे सामाजिक संघटनांनी निदर्शनात आणून दिल्यानंतर पालिकेने सूचना आणि हरकती पाठविण्याची मुदत 8 फेबुवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

पालिकेच्या विभाग कार्यालयांमधूनही योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार करीत सूचना आणि हरकती पाठविण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. पालिका प्रशासानाने ही मागणी मान्य केली असून त्या पाठविण्यासाठी 15 दिवासांची मुदत वाढ दिली आहे. याआधी ही मुदत 10 जानेवारीला संपणार होती; मात्र त्या अपेक्षेप्रमाणे न आल्याने ही मुदत 24 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली होती; मात्र ही मुदत अपुरी असल्याची तक्रार आल्यानंतर पालिकेने आत 8 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे, अशी माहिती विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता राजीय कुक्कुनूर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad