महाराष्ट्राला ७७८ कोटींचा दुष्काळनिधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 January 2013

महाराष्ट्राला ७७८ कोटींचा दुष्काळनिधी

राज्यातील २५ जिल्ह्यांतील १२५ दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी केंद्र सरकारने ७७८ ०९ कोटींची खास मदत गुरुवारी जाहीर केली दुष्काळाग्रस्त राज्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरदपवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या केंद्रीय उच्चाधिकार समितीने दुष्काळनिधी देऊन महाराष्ट्राला दिलासा दिला आहे 

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी स्थितीकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने ऑगस्टमध्ये या समितीची तसेच पंतप्रधानांचीही भेट घेऊन दुष्काळ निवारणासाठी खास पॅकेजची मागणी केली होती उच्चाधिकार समितीच्यागुरुवारच्या बैठकीत महाराष्ट्राला दुष्काळ निवारणासाठी ७७८ ०९ कोटींची तर कर्नाटकाला ५२६कोटींच्या आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला 

गेली दोन वर्षे राज्यातील २५ जिल्ह्यांतील १२२ तालुक्यांमधे दुष्काळी स्थिती आहे पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे राज्य सरकारने १२५ तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे त्यानंतर केंद्र सरकारचे संयुक्त सचिव आर .बी सिन्हा यांच्या पथकाने राज्याच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली होती त्यांच्या आढावानंतर आता दुष्काळ निधी देण्यात आला आहे 

निधी कशाकशाला ? ( कोटी रु .) 
शेतीः ५६३ २९ 
बागायती शेतीः ९१ २९ 
पशु संवर्धनः ७२ ८८ 
पाणीपुरवठाः ५० ६३ 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad