मुंबईकरांच्या पाण्याची चोरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 January 2013

मुंबईकरांच्या पाण्याची चोरी


मुंबईमधील नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर आहे. मुंबईची लोकसंख्या पाहता मुंबईला दररोज ४२५० एम एल डी पाण्याची आवश्यकता आहे. परंतू पालिका फक्त ३३५० एम एल डी पाणी पुरवठा करू शकत आहे. एकीकडे पाण्याचा पुरवठा कमी होत असताना दुसरीकडे पालिकेचे पाणी मुंबईकरांना मिळायला हवे त्या पाण्याची चोरी होत आहे.
 
महाराष्ट्रा मधील कित्तेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असल्याने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील लोकांना  ट्य़ाण्कर (tanker) द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे हि बाब समजण्यासारखी आहे परंतू मुंबई मध्ये कोठेही दुष्काळ जाहीर झाला नसताना हजारो ट्य़ाण्कर (tanker) पाणी पालिकेच्या पाण्याच्या यार्ड मधून भरून जातात कुठे असा प्रश्न उपस्थित होत असतानाच मुंबईच्या पाणी चोरी बाबत नुकताच ऑबझरवर रिसर्च या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.मुंबईकरांच्या वाट्याचे पाणी माफियांकडून चोरी करून दरदिवशी करोडो रुपये कमावले जात असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
 
मुंबईकरांना महानगर पालिकेच्या धरणांमधून ३३५० एम एल डी पाणी पुरवठा केला जात असला तरी या पाण्यापैकी मुंबैकारांपर्यंत पाणी पोहचे पर्यंत ७०० एम एल डी पाणी वाया जाते. आज पुण्या सारख्या शहराला ६५० एम एल डी पाण्याची आवश्यकता आहे. परंतू मुंबईमध्ये पुणे शहराला जेवढे पाणी लागते तेवढे पाणी पाणीगळती म्हणून वाया घालवले जात आहे. मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्या मधील एकूण ७०० एम एल डी पाणीगळती पैकी १६० एम एल डी पाण्याची ट्य़ाण्कर (tanker) लॉबीकडून चोरी केली जाते. 
 
ऑबझरवर या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई मध्ये १० हजार ट्य़ाण्कर (tanker) पाणीचोरी करतात. एक ट्य़ाण्कर (tanker) १० हजार लिटर्स क्षमतेचा असतो या एका ट्य़ाण्कर (tanker) साठी ३ ते ४ हजार रुपये घेतले जातात. ४ हजार रुपयांप्रमाणे विचार केल्यास १० हजार ट्य़ाण्कर (tanker) मागे दिवसाला ४ कोटी रुपये तर वर्षाला १४६० कोटी रुपये पाणी माफियांना पाणी चोरीमधून मिळत आहेत.
 
मुंबई मध्ये पालिकेच्या व इतर विभागांच्या परवानगी शिवाय बिल्डरांनी जास्त माळे असलेल्या इमारती उभारलेल्या आहेत. या इमारतींना, अधिक बांधलेल्या माळ्यांना परवानगी नसल्याने पालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नाही. या इमारतीमधील रहिवाश्यांना पाणी पुरवठा करणे गरजेचे असल्याने बिल्डर पाणीचोरी करणाऱ्या लोकांशी संगनमत करून अनधिकृत असलेल्या इमारतींना पाणी पुरवठा केला जातो.
 
मुंबई मधील झोपडपट्टीमध्ये पालिका योग्य प्रकारे पाणी पोहचवू शकत नसल्याने झोपडपट्टी मधील रहिवाश्यांना ट्य़ाण्कर (tanker) द्वारे पाणी मिळवावे लागत आहे. झोपडपट्टी मध्ये पाणीपुरवठा करणारे काही ट्य़ाण्कर (tanker) स्थानिक लोकप्रतिनिधींचे असून लोकांना पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली हे लोकप्रतिनिधी पैसा कमावण्याचा धंदा करत आहेत. 
 
मुंबई मधील पालिकेच्या पाण्याच्या यार्ड मधून पालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताने हि पाणीचोरी होत आहे. पालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या खिश्यामध्ये पाणीचोरी मधून मिळणाऱ्या १४६० कोटी रुपयांपैकी मोठा हिस्सा जात असल्याने मुंबई मध्ये पाणी चोरीचा धंदा जोरात चालाला आहे. पाणीचोरी होते हे पालिकेच्या मुख्यालायामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहित असले तरी पाणी माफियांच्या भीतीने आणि पाणी माफियांकडून मिळणाऱ्या मोबदल्याच्या बदल्यात पाण्याच्या चोरीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
 
बहुतेक करून ट्य़ाण्कर (tanker) हे लोकप्रतिनिधीचे आहेत. पाणीचोरी मधून मिळणारा पैसा पालिकेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवला जात असला तरी पालिकेमधील सत्ताधारी  शिवसेना, भाजपा तसेच विरोधात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्षाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३ 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad