मुंबई : मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीसाठी मुंबई महानगरपालिकेतून एकूण 80 नगरसेवकांची वर्णी लागणार असून यामध्ये 40 नगरसेवकांची नियुक्ती मुंबई शहर भागातून तर 40 नगरसेवक मुंबई उपनगरातून दिले जाणार आहेत. ही नियुक्ती निवडणुकीद्वारे केली जाते, मात्र पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी सकारात्मक चर्चेतून सर्व सदस्यांची नेमणूक बिनविरोध करण्याचे ठरवल्याने केवळ निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी उरली आहे. जिल्हा नियोजन समितीवर नगरसेवकांची नियुक्ती करताना त्या-त्या पक्षाच्या संख्येनुसार सदस्यांना संधी असते; परंतु निवडणुकीद्वारे या सदस्यांची नेमणूक झाल्यास सपा व राष्ट्रवादीसारख्या छोटय़ा संख्येने पक्षांना याचा सर्वाधिक फटका बसला असता. मात्र विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम आणि सभागृह नेते यशोधर यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय गटनेत्यांनी ही निवडणूक घेऊन प्रत्येक पक्षाला जागा ठरवून दिल्या. त्यानुसार, मुंबई शहर भागात सत्ताधारी सेना-भाजपाला एकूण 26 जागा प्राप्त झाल्या तर विरोधी पक्षांना 14 जागा मिळाल्या आहेत. याचप्रमाणे उपनगर भागातही सत्ताधारी 26 आणि विरोधक 14 अशा जागांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीवर सदस्यांची नेमणूक करताना सर्वसाधारण गट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग यानुसार नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे. |
Post Top Ad
24 January 2013
Home
Unlabelled
जिल्हा नियोजन समितीवर नगरसेवकांची निवड बिनविरोध
जिल्हा नियोजन समितीवर नगरसेवकांची निवड बिनविरोध
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment