मुंबई : मुंबईकरांना इंटरनेट सेवा तसेच इतर सेवा केबलद्वारे देताना विविध कंपन्यांना महानगरपालिकेचे शुल्क घेऊन भूमिगत केबल टाकणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अंजना मुणगेकर यांनी केली आहे.
मुंबईत अनेक कंपन्या के बलच्या माध्यमातून अनेक सेवा पुरवत असतात, मात्र या सेवा देताना टाकण्यात येणार्या केबल या झाडावरून, इमारतींच्या गच्चीवरून, लाईटचे खांब इत्यादींच्या आधाराने टाकण्यात येतात. त्यामुळे मुंबईत केबल्सचे महाजाळे तयार आले असून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. तसेच यामुळे मुंबईच्या सौंदर्यीकरणासही बाधा पोहचत आहे. काही ठिकाणी रहादारीच्या रस्त्यावर या केबल्स तुटण्याचे प्रकार घडल्याने अपघातही झाले आहेत. केबल्स भूमिगत टाकून त्यासाठी शुल्क आकारल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही भर पडेल, त्यामुळे या कंपन्यांना केबल्स भूमिगत टाकण्यासाठी सशुल्क परवानगी द्यावी, अशी मागणी मुणगेकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment