रिपब्लिकन सेनेच्या दणक्याने दुकानदारावर गुन्हा दाखल
मुंबई / अजेयकुमार जाधव
दादर येथील दुकानामध्ये भगवान बुद्धांच्या मुखवट्याचे कुलूप बनवून दुकानात या कुलुपांची विक्री करणाऱ्या महाडवाले आडके आणि कंपनीच्या मालकाविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दादर येथील दुकानामध्ये भगवान बुद्धांच्या मुखवट्याचे कुलूप बनवून या कुलुपांची विक्री केली जात असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या दक्षिण मध्य मुंबई प्रमुख दयानंद परिक्षाळे यांना मिळताच त्यांनी संघराज रुपवते, काशिनाथ निकाळजे, रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्यकर्त्यांसह सदर दुकानात जाऊन शहानिशा केली. दुकानदाराकडून त्याची पावती घेवून दुकानदाराकडून ७६० रुपयांना कुलूप खरेदी केले.
या कुलुपामध्ये भगवान गौतम बुद्धांचा मुखवटा लावल्याने बौद्ध समाजातील लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची विटंबना केल्याने परीक्षाळे यांनी सदर कुलूप बनवणाऱ्या दुकान मालका विरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
No comments:
Post a Comment