'मॉस्किटो किलिंग मशीन'चा डेमो दाखवण्याची नगरसेवकांची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2013

'मॉस्किटो किलिंग मशीन'चा डेमो दाखवण्याची नगरसेवकांची मागणी


मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईतील डासांच्या निर्मूलनासाठी मॉस्किटो किलिंग सिस्टिम मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मशीनबाबत मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत ही मशीन कशावर चालणार आहे तसेच या मशीनची देखभाल कोण करणार, असा सवाल उपस्थित केला. या मशीनचा डेमो सर्व स्थायी समितीच्या सदस्यांना दाखवून तांत्रिक माहिती द्यावी तोपर्यंत मशीन खरेदीचा प्रस्ताव राखून ठेवावा, अशी मागणी देशपांडे यांनी केली. 

यावर बोलताना काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी ही मशीन चांगली असेल व या मशीनबाबत पालिका प्रशासनाला विश्वास असेल तर मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये या मशीन लावण्यात याव्यात, अशी सूचना केली. मुंबईत डासांचे निर्मूलन करण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपयोगी प्रयत्न करत असते असे सांगत अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्थेने या मशीनबाबत शिफारस केल्याचे स्पष्ट केले. डासांना आपल्याजवळ आत्कृष्ट करणे व डास आकर्षित झाल्यानंतर डासांचा नायनाट करणे ही या मशीनची टेक्नोलॉजी असल्याचे म्हैसकर यांनी सांगितले. या मशीन खरेदीच्या टेंडरमध्ये देखभालीचाही समावेश असून प्रत्येक झोनमध्ये एक मशीन लावण्यात येणार असल्याचे म्हैसकर यांनी सांगितले. मशीन लावण्यानंतर सर्व सदस्यांना डेमो दाखविण्यात येणार असून एक नवीन पद्धत म्हणून याची पायलट प्रोजेक्ट म्हणून अंमलबजावणी केली जाणार असल्याचे म्हैसकर यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad