मुंबई : पालिका प्रशासनाने वॉर्ड स्तरावरील रस्ते व पदपथांची कामे मध्यवर्ती यंत्रणेला दिल्याने नगरसेवकांच्या विभागातील कामे होत नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका मनीषा पांचाळ यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे पालिका सभागृहात केला. परिणामी नगरसेवकांचा निधी लॅप्स होऊन जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
नगरसेविका मनीषा पांचाळ यांनी आपल्या विभागातील पदपथांची कामे निधी असतानाही गेल्या दोन वर्षापासून रखडण्याची तक्रार सभागृहात केली. पांचाळ यांच्या हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा देताना माजी महापौर नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी प्रशासनाला फैलावर घेत वॉर्डमार्फत होत असलेली पदपथांची कामे मध्यवर्ती यंत्रणेला दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे नगरसेवकांना जनतेला जाब द्यावा लागतो. यासाठी ही कामे पुन्हा वॉर्ड स्तरावर देण्याची मागणी केली. भाजपाचे नगरसेवक विनोद शेलार यांनी पालिकेने प्रत्येक कामासाठी कंत्राटदार नेमण्याची गरज नसल्याचे सांगत यासाठी प्रशासकीय अधिकारी सक्षम असल्याचे सांगितले. कंत्राटदारांना कामे दिल्याने किंमत वाढून नाहक पालिकेला भुर्दड पडतो, असे त्यांनी सांगितले. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी ज्या ठिकाणी कं त्राटदार नाहीत, तेथे उपलब्ध केले जातील, असे सांगत याद्वारे छोटी-छोटी कामे केली जातील, असे स्पष्ट करत आपली बाजू निभावून नेली.
No comments:
Post a Comment