ईपीएफ कायद्यातील दुरुस्तीमुळे असंघटित कर्मचार्‍यांना लाभ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 January 2013

ईपीएफ कायद्यातील दुरुस्तीमुळे असंघटित कर्मचार्‍यांना लाभ


मुंबई : देशातील असंघटित क्षेत्रामधील कर्मचार्‍यांना सुरक्षित करण्याचा एक भाग म्हणून ऑल पार्किग पीपल ऑर्गनायझेशनने येत्या केंद्रीय अंदाजपत्रकात एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँक्टमध्ये सुधारणा करण्याचे संकेत दर्शवले आहेत. त्यामुळे एक कर्मचारी असणार्‍या संख्येलाही त्याच्या अख्त्यारीत आणले जाणार असल्याचे खासदार एकनाथ गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

देशाला स्वातंर्त्य मिळून 65 वर्षे झाल्यानंतरही भारतातील नोकरदार वर्गापैकी केवळ 7 टक्के लोक ईपीएफच्या अख्त्यारीत येत आहेत, तर उर्वरित 93 टक्के लोकांना आजही ईएफचे लाभ मिळत नसल्याचे सांगत तरुण नोकरदारांना या कामापासून वंचित राहावे लागू नये म्हणून ईपीएफ कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

ईपीएफ कायद्यातील दुरुस्तीमुळे असंघटित क्षेत्रातील अंदाजे 30 कोटी लोकांना सामाजिक सुरक्षा पुरवता येणे शक्य होणार आहे. याचा लाभ ड्रायव्हर्स, मोलकरीण यांना होणार असून सध्या लाभ मिळत नसणार्‍या कष्टकरी वर्गापैकी 25 टक्के व्यक्तींना या कायद्याच्या अख्त्यारीत आणले तरीदेखील 50 हजार कोटी रुपये वाचवता येणे शक्य होणार असल्याचे के. पी. जैन यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad