मुंबई : मुंबई आणि उपनगरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याची ओरड सुरू असतानाच दहिसर (पू.), केशव नगर येथील मोकळय़ा जागेत उभारलेल्या अनधिकृत झोपडय़ांवर महानगरपालिकेच्या आर-उत्तर विभागाने कारवाई केली आहे.
मुंबईतील उपनगरांमध्ये अनधिकृत झोपडपट्टय़ांचे पुन्हा पेव फुटल्याचे वाढीव अनधिकृत झोपडपट्टय़ांमुळे उघड झाले आहे. अशा झोपडपट्टय़ांवर कारवाई करण्यास महानगरपालिका प्रशासन उदासीन असल्याचे म्हटले जात आहे, मात्र दहिसर (पू.), केशव नगर येथील मोकळय़ा जागेत 50हून अधिक अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहिल्याची माहिती मनपाच्या आर-उत्तर विभागाला मिळताच इमारत विभागाचे दुय्यम अभियंता नितीन कांबळे यांनी आपल्या तोडक दस्त्यासह घटनास्थळी धाव घेऊन अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई केली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईमुळे भूमाफियांमध्ये खळबळ माजली आहे. अनधिकृत बंधकामांवर अंकुश लावण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरूच ठेवणार असल्याचे नितीन कांबळे यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment