रेल्वेत मिळणार्‍या जेवणाबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 January 2013

रेल्वेत मिळणार्‍या जेवणाबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक

नवी दिल्ली : रेल्वेत मिळणार्‍या जेवणाबद्दल काही तक्रार असेल तर रेल्वेने तुमची तक्रार नोंदवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. 1800111321 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही आठवडय़ातले सातही दिवस सकाळी 7 ते रात्री 10 दरम्यान आपली तक्रार नोंदवू शकता. रेल्वेत मिळणार्‍या जेवणाविषयी वाढत्या तक्रारी लक्षात घेता रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही पावले उचलताना ग्राहकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला. या क्रमांकावर तक्रार केल्यास त्याची तत्काळ दखल घेतली जाईल, असे बन्सल यांनी सांगितले आहे. या क्रमांकावरून तुम्ही कॅटरिंगसंदर्भातली कुठलीही तक्रार नोंदवू शकता. जसे की, जास्तीचे दर घेणे, कमी जेवण देणे किंवा निकृष्ट दर्जाचे जेवण देणे या संदर्भातील तक्रार नोंदवण्याची सोय रेल्वेने ग्राहकांना उपलब्ध करून दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad