दि : १९/१/२०१२
मुंबई / रशीद इनामदार
हल्ली देशभर महिला आत्याचाराविरुद्ध वातावरण तापलेलं असताना अजूनही ह्या प्रवृतीत सुधारणा झाल्याचं समाधानकारक चित्र दिसत नाही . पण अबला जेंव्हा पेटून उठते तेंव्हा ती रणरागिणी ठरते याची प्रचीती आज बदलापूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस असा रोजचा प्रवास करणाऱ्या महिलांनी दाखवून दिली .
दररोज नोकरीनिमित्ताने बदलापूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस करणाऱ्या महिलांच्या एकीमुळे आज महिलांची छेडछाड करणाऱ्या टवाळखोर तरुणांची पाचावर धारण बसली . महिलांच्या मागच्या डब्याच्या दरवाजावर उभे राहून महिला प्रवाशांची शिट्या वाजवून , निरनिराळे आवाज काढून,अव्राच्य भाषेत मुद्दाम मोठ्याने संभाषण करून छेड काढणाऱ्या टवाळखोरांच्या त्रासाला वैतागलेल्या महिलांनी त्यांचे चेहरे नीट पाहून घेतले .ठाणे स्थानकात गाडी आल्यावर मोबाइल्वरुन पोलिसांना या रोजच्या प्रकाराबद्दल कळवले. त्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी व रेल्वे पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन दादर स्थानकात महिलांच्या डब्याच्या आजूबाजूला सापळा लावला. परंतु दादर स्थानक आल्यावर त्या टवाळखोर गटातले तरुण आधीच उतरून निघून गेले. महिलांनी पोलिसांना त्यांच्यापैकी एकजण गाडीतच असल्याचे दाखवले .पोलिसांनी त्याला गाडीतच अटका करून छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. महिलांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस पोलिस ठाण्यात आपली फिर्याद नोंदवली आहे.अशा रीतीने महिलांनी टवाळखोर तरुणांना धडा शिकविला
No comments:
Post a Comment