व्यावसायिक रंगभूमीवर सादर होणार्या दर्जेदार लोकनृत्याइतक्याच तोंडीची सोमवारी सादर झालेली लोकनृत्ये हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या स्पध्रेत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी अतिशय बहारदार उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर करून खर्या अर्थाने मराठी अस्मितेचे दर्शन घडवले, असे गौरवोद्गार महापौर सुनील प्रभू यांनी लोकनृत्यांच्या अंतिम स्पर्धाच्या पारितोषिक वितरण सोहळ्य़ात बोलताना काढले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वभाषिक प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या लोकनृत्यांच्या अंतिम स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा माटुंग्याच्या यशवंत नाटय़ मंदिरात आयोजित करण्यात आला होता. या स्पध्रेचे उद्घाटन महापौर सुनील प्रभू उपमहापौर मोहन मिठबावकर, शिक्षण समिती अध्यक्षा विठ्ठल खरटमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा फाल्गुनी दवे, नगरसेविका भाग्यश्री शिवलकर, शिक्षण उपायुक्त सुनील धामणे, प्रख्यात नृत्यांगना व कोरिओग्राफर फुलवा खामकर, नगरसेवक प्रमोद शिंदे, शिक्षणाधिकारी रवींद्र भिसे, उपशिक्षणाधिकारी डॉ. केळुसकर, मिर्झा बेग, संजीवनी देशपांडे, चंद्रकोश सिंग, चोपडेकर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment