ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची कालमर्यादा वाढल्यामुळे खर्चात तीनपटीने वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 January 2013

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची कालमर्यादा वाढल्यामुळे खर्चात तीनपटीने वाढ


मुंबई : सर्व मलनिस्सारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्याद्वारे हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची कालमर्यादा वाढल्यामुळे प्रकल्पाचा खर्च तीनपटीने वाढला आहे. 2011 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा होती, मात्र आता त्याची अंतिम मुदत 2015 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती अभियांत्रिक संचालक (प्रभारी) लक्ष्मण व्हटकर यांनी शुक्रवारी दिली.

मुंबईतील जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्या आणि मलनिस्सारण तत्कालीन लोकसंख्या लक्षात घेऊन उभारण्यात आल्या होत्या,मात्र वाढत्या लोकसंख्येवर हा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. 2005 रोजी झालेल्या विक्रमी पावसामुळे वाहिन्यांची कार्यक्षमता उघडी पडली होती. याची दखल घेत केंद्र सरकारच्या सहकार्याने ब्रिमस्टोवॅड प्रकल्प राबवण्याचा विचार करण्यात आला. या प्रकल्पात केंद्र सरकारने 1 हजार 200 कोटी रुपयांची आर्थिक मदत पालिकेला केली आहे, मात्र विविध कारणांमुळे प्रकल्पाची कालमर्यादा वाढली आहे आणि त्याचाच फटका प्रकल्पास बसला आहे. प्रकल्पाच्या कामास विलंब झाल्याने या प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. या प्रकल्पाचा खर्च आता 1200 कोटींवरून 2900 कोटींपर्यंत पोहचला होता. आता पुन्हा अंतिम मुदत वाढल्याने हा आकडा 3900 कोटींपर्यंत पोहचणार असल्याचे व्हटकर यांनी सांगितले.

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पात पर्जन्य जलवाहिन्या बांधणे, दुरुस्ती व परीक्षण, नालेसफाई, नाल्यांची रूंदी-खोली वाढवणे, त्यांना संरक्षण भिंती बांधणे, शहर व उपनगरातील पर्जन्य जल उदंचन केंद्र बांधणे इ. महत्त्वांच्या कामांचा या प्रकल्पात समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad