मुंबई : दिल्लीतील धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर तिच्या झालेल्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. देशातील विविध भागांमध्ये महिलांवर अत्याचारांनी घातलेला थैमान हे गुन्हे माणुसकीला काळिमा फासणार्या घटना आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे संरक्षण कवच महिलांना देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये यासाठी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय योजावेत, अशी मागणी करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने कँडल मार्च काढण्यात आला.
नव्या वर्षात महिला अत्याचाराची एकही घटना होऊ देणार नाही, हा संकल्प घेऊन रिपाइंच्या वतीने गेटवे ऑफ इंडिया येथे कँडल मार्च काढून बलात्कार्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करीत बलात्कारपीडित तरुणीला श्रद्धांजली वाहण्यात आली. दिल्लीतील त्या तरुणीचा मृत्यू दु:खदायक असल्याचे सांगून महिलांच्या सुरक्षेवर समाजात जनजागृती व्हायला हवी, यासाठी रिपाइंच्या वतीने येत्या 3 जानेवारी 2013 रोजी सावित्रीमाई जयंतीपासून पथनाटय़ तयार करून ते गल्लोगल्ली सादर करणार आहोत, असे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment