प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 'स्वतंत्र प्रोजेक्ट मॅनेजमेंट'ची स्थापना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2013

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 'स्वतंत्र प्रोजेक्ट मॅनेजमेंट'ची स्थापना

मुंबई : शहराच्या सर्वागीण विकासासाठी तसेच आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिस्सारण या मूलभूत सेवासुविधांचे प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यासाठी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या आयुक्त कार्यालयाच्या कक्षेत 'स्वतंत्र प्रोजेक्ट मॅनेजमेंट कार्यालय' सुरू करण्यात आले आहे. 

मुंबई महापालिका प्रशासनाच्या स्वतंत्र प्रोजेक्ट मॅनेजमेंट कार्यालर्याच्या वतीने पालिकेच्या अभियांत्रिकी, आरोग्य, शिक्षण तसेच राज्य शासनाशी संबंधित प्राधिकरणे यांच्यासमवेत समन्वय तसेच साप्ताहिक आढावा घेऊन हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणार्‍या अडचणीसंबंधी सर्व अधिकार्‍यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापालिका आयुक्त(प्रकल्प) राजीव जलोटा, अतिरिक्त महापालिका आयुक्त(शहर) मोहन अडताणी, महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) असीमकुमार गुप्ता आणि संबंधित उपायुक्त व खातेप्रमुख उपस्थित होते. ही अभिनव संकल्पना पालिका आयुक्तांनी राबवण्याचे ठरवले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad