मुंबई : गतवर्षात कुर्ला रेल्वे पोलिसांनी 80 टक्केगुन्ह्यांची उकल केली आहे. चोरीला गेलेल्या 29 लाखांच्या मुद्देमालाचे फिर्यादींना वाटप करण्याचे उल्लेखनीय काम केल्याने त्यांचे पोलीस अधिकार्यांकडून कौतुक करण्यात आले. 1 जानेवारी ते 7 जानेवारी हा सप्ताह लोहमार्ग आयुक्तालयाच्या वतीने सुरक्षा सप्ताह म्हणून पाळला जातो. या सप्ताहाच्या अनुषंगाने बुधवारी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या व उघडकीस आलेल्या गुन्ह्यांतील हस्तगत मालमत्ता मूळ मालकांना परत करण्याचा कार्यक्रम आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत आयोजित करण्यात आला होता. कुर्ला रेल्वे पोलिसांनी 2012 या गतवर्षात दाखल झालेल्या एकूण 313 गुन्ह्यांपैकी 274 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले. यातील 28 लाख 87,839 रुपयांची मालमत्ता मूळ मालकांना बुधवारी परत करण्यात आली. पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणण्याचे हे प्रमाण 80 टक्क्यांएवढे असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकार्यांनी कुर्ला रेल्वे पोलिसांचे कौतुक केले आहे. चोरीला गेलेले मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम परत मिळाल्याने फिर्यादींनी समाधान व्यक्त केले आहे.
Post Top Ad
03 January 2013
Home
Unlabelled
कुर्ला रेल्वे पोलिसांकडून 80 टक्के गुन्ह्यांची उकल
कुर्ला रेल्वे पोलिसांकडून 80 टक्के गुन्ह्यांची उकल
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment