अँट्रॉसिटीची 328 प्रकरणे नांदेड न्यायालयात पल्रंबित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2013

अँट्रॉसिटीची 328 प्रकरणे नांदेड न्यायालयात पल्रंबित


नागरी हक्क संरक्षण, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 अर्थात अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत 1 जानेवारी 1995 ते 31 ऑक्टोबर 2012 या सात वर्षात नांदेड जिल्ह्यात एकूण एक हजार 17 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील तब्बल 328 प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची सद्यस्थिती, स्वरूप व वर्गीकरण याबाबींचा आढावा घेण्यात आला. एकूण दाखल गुन्ह्यांपैकी 949 गुन्हे अनुसूचित जातींची तर 68 गुन्हे अनुसूचित जमातीसंबंधीचे आहेत.

सात वर्षात दाखल झालेल्या 1017 गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे 431 गुन्हे जातीवाचक- शिवीगाळ केल्याबाबतचे आहेत. 75 गुन्हे बलात्काराचे तर 67 गुन्हे विनयभंगाचे आहेत. तसेच खुनाचे 24 गुन्हे दाखल आहेत. अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी तब्बल 328 प्रकरणे न्यायालयात पल्रंबित आहेत. आतापर्यंत केवळ 16 जणांना या कायद्याखाली शिक्षा झाली आहे तर 550 प्रकरणांतील आरोपींची निदरेष सुटका झाली आहे. 107 प्रकरणे पोलिसांनी बी-फायनल केली आहेत. तसेच 16 प्रकरणांचा पोलीस तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad