लंडन : इंधन दरवाढीला पर्याय ठरणार्या इलेक्ट्रिक कारकडे आज भविष्यातील वाहतूक व्यवस्था म्हणून पाहिले जात असले तरी अशा कारची प्राथमिक आवृत्ती 20व्या शतकाच्या प्रारंभीच तयार करण्यात आली होती. व्ॉकी रेसेस व गोल्फ बग्गी यांचा मिलाफ वाटणार्या या कारचा वेग फक्त 25 मैल प्रती तास होता. ताशी 100 मैलांचाही वेग ती घेत असे, पण त्यासाठी प्रत्येक प्रवासाआधी तिला 6 फूट उंचीचा चार्जर जोडावा लागत असे. डेट्रॉइट इलेक्ट्रिक कंपनीची ही कार त्याकाळी 1500 डॉलर (म्हणजे आजच्या कळातील 85 हजार डॉलर) किमतीला विकली जात असते. मात्र पुढे पेट्रोलवर धावणार्या कार मोठय़ा प्रमाणात बाजारात दाखल झाल्यानंतर 1920 च्या दशकात या इलेक्ट्रिकची निर्मिती बंद पडली. काळाच्या पुढचे संशोधन ठरलेली अशाच एका 103 वर्षांपूर्वी बनलेल्या व सध्या धूळ खात पडून असलेल्या कारची 50 हजार डॉलरला विक्री केली जाणार आहे. निस्सानच्या इलेक्ट्रिक कारसाठी आज 25 हजार डॉलर मोजावे लागतात. पेट्रोल कार बाजारात येण्याआधी वापरण्यास अतिशय सोपी असलेल्या या कारचा लोकांची मोठी पसंती होती. याच कारणामुळे फोर्ड मोटरचे संस्थापक हेन्री फोर्ड यांनी आपल्या पत्नीसाठी अशा दोन कार खरेदी केल्या होत्या.
Post Top Ad
19 January 2013
Home
Unlabelled
103 वर्षापूर्वीच्या इलेक्ट्रिक कारची विक्री होणार
103 वर्षापूर्वीच्या इलेक्ट्रिक कारची विक्री होणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment