मुंबई : शिवाजी पार्क येथे असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा केव्हा बसवण्यात आली, याबाबतची माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. महानगरपालिकेने सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांना ही माहिती उपलब्ध करत या मैदानाचा इतिहास व महत्त्वसुद्धा पालिकेच्या अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महानगरपालिकेच्या चिटणीस कार्यालयाकडे माहिती विचारली होती की, शिवाजी पार्क असे नामकरण पालिकेने केव्हा समंत केले. तसेच या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा केव्हा बसवण्यात आली आणि पालिकेच्या अभिलेखाप्रमाणे या मैदानाचा इतिहास व महत्त्व काय आहे. महानगरपालिकेच्या चिटणीस कार्यालयाच्या अभिलेख विभागाने महाराजांची बसवलेल्या प्रतिमेची आणि या मैदानाच्या इतिहास व महत्त्वाची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले.
शिवाजी पार्क असे नामकरण मंगळवार, 10 मे 1927 रोजी संमत करण्यात आले होते. जी. बी. नरे जयंतीनिमित्त 'शिवाजी पार्क' या नामकरणाच्या प्रस्तावाला अवंतिकाबाई गोखले यांनी अनुमोदन दिले होते. महानगरपालिकेच्या अभिलेख विभागाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची माहिती उपलब्ध नसल्याची बाब आश्चर्यजनक व खेदजनक असल्याची बाब नमूद करत अनिल गलगली यांनी याबाबत पालिकेच्या उदासीन व संथ कामकाजावर टीका केली.
No comments:
Post a Comment