मराठ्यांच्या ओबीसीकरणा विरोधात खासदारांच्या पुतळ्यांचे दहन करणार - संजय कोकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2012

मराठ्यांच्या ओबीसीकरणा विरोधात खासदारांच्या पुतळ्यांचे दहन करणार - संजय कोकरे


मुंबई / अजेयकुमार जाधव 
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नसून मराठ्यांचे ओबीसीकरण करण्यास आमचा विरोध आहे. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला तेव्हा महाराष्ट्रातील एकही खासदाराने मराठ्यांचे ओबीसीकरणास विरोध दर्शवला नसल्याने महाराष्ट्रातील सर्व खासदाराचे पुतळे त्यांच्या घरासमोर दहन करू असा इशारा ओबीसी एनटी पार्टीचे संजय कोकरे यांनी दिला आहे.

सत्ताधाऱ्यांना ओबिसीच्या मताची किंम्मत कळली नसल्याने सत्ताधारयाना ओबीसींच्या मताची जाणीव करून देण्यासाठी व ओबीसी समाजातील जाणीव सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी एप्रिल, मे २०१३ ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ४१ दिवसांची रथयात्रा काढणार असल्याचे कोकरे यांनी सांगितले. येत्या १ जानेवारी पासून ओबीसींमध्ये जनजागृती अभियान सुरु करत असून २६ जानेवारी रोजी सर्व खासदारांच्या घरासमोर त्यांचे पुतळे जाळण्यात येणार असल्याचे कोकरे यांनी सांगितले. 

२००५ पासून मराठा आरक्षणा संदर्भात अहवाल लोकसभेमध्ये पडून असून खासदार सुदर्श नचीपण यांच्या अध्यक्षते खाली  एक समिती नेमण्यात आली होती. या कमिटीने आरक्षणाची ५० टक्यांची अट तोडून टाकण्यास सांगितले आहे.परंतु याबाबत कोणतीही कारवाही केली जात नसल्याने कोकरे यांनी नाराजी व्यक्त केली. गरीब मराठ्यांना खरोखरच काही द्यायचे असल्यास शरद पवार यांची सर्व संपत्ती गरीब मराठा समाजाच्या लोकांमध्ये वाटल्यास मराठा समाजाचे बहुतेक प्रश्न सुटू शकतील असे कोकरे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad