काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या ब्यानरवर डॉ. आंबेडकरांचा फोटो कशाला ? - अर्जुन डांगळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2012

काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या ब्यानरवर डॉ. आंबेडकरांचा फोटो कशाला ? - अर्जुन डांगळे


मुंबई / अजेयकुमार जाधव 
कॉग्रेसशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काही संबंध नसताना काँग्रेसच्या स्थापनादिवाशी लावण्यात आलेल्या ब्यानरवर आंबेडकरांचा फोटो कशाला असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने आंबेडकरांचा फोटो वापरू नये अशी मागणी रिपाइ आठवले गटाचे प्रवक्ते अर्जुन डांगळे यांनी केली आहे.

आज २८ डिसेंबरला कॉंग्रेसचा स्थापना दिवस साजरा केला जात असताना मुंबईभर लावलेल्या ब्यानरवर कॉंग्रेसच्या जडणघडणीत सहभागी असलेल्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्या फोटोमध्ये आंबेडकर यांचाही फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. आंबेडकरांच्या या फोटोला रिपाइने आक्षेप घेतलेला आहे.

आंबेडकर यांनी वेळोवेळी काँग्रेसवर टीका केली आहे.काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न किताब देण्यास डावलले होते. संसदेत बाबासाहेबांचे तैलचित्र लावण्यासही काँग्रेसने विरोध केला होता.यामुळे बाबासाहेबांचे फोटो काँग्रेसच्या ब्यानरवर लावल्याबद्दल डांगळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बाबासाहेबांचे फोटो वापरण्यापेक्षा महात्मा गांधी यांचे फोटो वापरून गांधी यांचे विचार लोकांमध्ये पसरवावेत असा टोमणा डांगळे यांनी काँग्रेस मधील दलित नेत्यांना मारला. इंदू मिलच्या श्रेयाचे राजकारण करू नका अशी म्हणवणारी काँग्रेस स्वतःच इंदू मिलच्या श्रेयासाठी मेळावे आयोजित करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप डांगळे यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad