मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर मध्ये विविध समस्या आहेत. राज्यामध्ये व पालिकेमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सत्ता असली तरी आपण एक दिलाने विचार करून काम केल्यास मुंबईचा विकास करू शकतो असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. ते बैल बाजार येथील प्रसुतीगृहाच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलताना पालिकेमध्ये शिवसेनेची राज्यामध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता असली तरी नागरिकांना चांगल्या सोयी उपलब्ध करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचे उद्धीस्ट आमच्या समोर असते. बैल बाजार येथील प्रसुतीगृहाचे भूमिपूजन आज झाले असले तरी पालिकेने सदर प्रसूतिगृह डिसेंबर २०१३ पूर्वी उभारावे असे आवाहन चव्हाण यांनी केले.
मुंबई उपनगरचे पालक मंत्री नसीम खान यांनी २००८ पासून पाठपुरावा केल्या नंतर आज २०१२ ला या प्रसुतीगृहाचे भूमिपूजन होत आहे. या प्रसूतिगृहाचा प्रस्ताव मंजूर व्हायला चार वर्षे लागली असली तरी डिसेंबर २०१३ मध्ये या वास्तूचे उद्घाटन व्हावे अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली. उपनगर मध्ये कित्येक पालिकेची रुग्णालये असून या रुग्णालयाच्या सौदर्यीकरण व नुतनिकरनाची गरज असून नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी कोअर टीम बनवावी असे खान यांनी सांगितले.
महापौर सुनील प्रभू यांनी प्रसुतीगृहाच्या प्रस्तावाला मंजूर व्हायला वेळ लागल्याचे मान्य करत चांगले काम करायचे असल्याने तीन वेळा स्थायी समितीमध्ये प्रस्ताव नॉट टेकन करण्यात आल्याचे सांगितले. चांगल्या क्वालिटीचे काम आपण नागरिकांना देणार असून येत्या डिसेंबर २०१३ पर्यंत सदर प्रसुतीगृहाचे उद्घाटन केले जाईल असे प्रभू यांनी दिले. सायन, केईएम, नायर प्रमाणेच सिटी स्क्यान, एमआयआर सारख्या सुविधा इतर छोट्या रुग्णालयातून देण्याचा प्रयत्न पालिका करत आहे. मधुमेहाचे रुग्ण वाढत असल्याने मोफत मधुमेह चाचणी तसेच १०० रुपयामध्ये डायलेसिसची सुविधा पालिका उपलब्ध करून देणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
मुंबई महानगर पालिकेची मुंबईमध्ये सर्वत्र रुग्णालये आहेत या रुग्णालयामध्ये काम करणारे डॉक्टर पालिकेच्या मेडिकल कॉलेज द्वारे केले जात आहे. या मेडिकल कोलेजला युनिवर्सिटीचा दर्जा मिळावा असे प्रयत्न पालिका करत आहे तसा प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव पास होऊन युनिवर्सिटीचा दर्जा मिळाल्यास नागरिकांच्या सोयी साठी चांगले डॉक्टर निर्माण करता येणार असल्याने महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः जातीने घालावे असे आवाहन प्रभू यांनी केले.
बैल बाजार येथे आता बैलांचा बाजार राहिला नसल्याने या विभागाला २६ नोव्हेंबरच्या हल्या मध्ये शहीद झालेल्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सभागृहामध्ये आणल्यास तो सर्वानुमते मंजूर केला जाईल असे आश्वासन प्रभू यांनी दिले.सदर कार्यक्रमाला महिला व बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड, कृपाशंकर सिंग, पालिकेतील विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम, पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा, असीम गुप्ता, प्रभाग समिता अध्यक्षा सईदा खान, नगरसेविका मनाली तुळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
बैल बाजार प्रसुतीगृहाचे बांधकाम क्षेत्रफळ दोन हजार चौरस फुट असून या बांधकामाला ५.४६ कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रसूतिगृहामध्ये ५० खाटांची सोय असून महिलांसाठी ३० तर लहान मुलांसाठी २० खाटा राखी असणार आहेत. ताल अधिक तीन मळ्याची हि इमारत उभी राहणार असून याचा फायदा सात लाख लोकांना होणार आहे.
No comments:
Post a Comment