हे काम अतिशय कठीण असून 450 टनाचा स्टिल मार्ग बीदर येथे तयार करून मुंबईत जुळविण्यात आला होता. रेल्वे ओलांडणी पुलाच्या मार्गाचे अशाप्रकारे लॉचिंग करणे रेल्वेसाठी कठीण काम होते. मात्र रेल्वे आणि प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि विलक्षण समन्वयामुळे हे काम होऊ शकले, असे प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. पहिल्या ब्लॉकमध्ये 17 मीटर आणि दुसर्या तिसर्या ब्लॉकमध्ये प्रत्येकी 22 मीटरचे काम अशा पद्धतीने पूर्ण करण्यात आले असे सबनीस यांनी सांगितले.
मीलन रेल्वे ओलांडणी पुलाद्वारे पूर्व-पश्चिम जोडणी उपलब्ध करून देणारा दुसरा स्टील मार्ग लवकरच लाँच करून पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. रु. 83.74 कोटी खर्चून बांधण्यात येणार्या या 700 मीटर लांबीच्या रेल्वे ओलांडणी पुलामुळे प्रत्येक पावसाळ्यात मीलन येथे पाणी तुंबल्याने निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा तडीस लागणार आहे.
No comments:
Post a Comment