नवीन वर्षात अत्याधुनिक पायाभूत सुविधा देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2013

नवीन वर्षात अत्याधुनिक पायाभूत सुविधा देणार

मुंबई : नवीन वर्षात मुंबईकरांना दर्जेदार नागरी सेवा आणि सुविधा देण्याबरोबर अत्याधुनिक पायाभूत सुविधा देण्याचा संकल्प महापौर सुनील प्रभू यांनी केला आहे. मुंबईकरांचे जीवन अधिकाधिक सुखकर करण्यासाठी मुंबई मनपा सदैव कटिबद्ध आहे, असे म्हणताना महापौरांनी मुंबईकरांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्षात मनपा कार्यालयातील कामकाज कागदविरहित म्हणजे पेपरलेस करण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात येईल असे आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले आहे.

मुंबईकरांची मते आणि सूचनांना नवीन विकास आराखडय़ात प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्यानेच बांधलेल्या मध्य वैतरणा धरणातून दररोज 450 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मुंबईकरांना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी मुंबईकरांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे. याशिवाय जलशुद्धीकरण प्रकल्पही सुरू करण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी म्हटले आहे. मालमत्ता कर सुधारणेअंतर्गत भांडवली मूल्यांवर आधारित करप्रणाली राबविण्याकरिता मुंबईकरांत सर्वसहमती निर्माण करणे, उपनगरातील डॉ. कूपर रुग्णालय अत्याधुनिक करणे, घनकचरा व्यवस्थापनाबाबत अधिक प्रभावीपणे उपाययोजना करणे आणि झोपडपट्टीवासीयांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रबोधन योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad