विरोधकांकडून स्थायी समिती अध्यक्षांचा निषेध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2013

विरोधकांकडून स्थायी समिती अध्यक्षांचा निषेध


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून सदस्यांना योग्य वागणूक मिळत नसून त्यांच्या अरेरावीपणामुळे मुंबईच्या विकासाच्या कामांवर बोलण्याची संधी हिरावून घेतली जात असल्याने येणार्‍या स्थायी सभेत अध्यक्षांचा निषेध करण्याची भूमिका विरोधी पक्षांकडून घेण्यात येणार आहे. पालिका अधिनियम कलम 49 अन्वये स्थायी समिती सभेच्या सुरुवातीला अजेंडय़ावरील कामकाज प्रारंभ करण्यापूर्वी 15 मिनिटे सदस्यांना किमान तीन हरकतीचे मुद्दे उपस्थित करण्याची परवानगी आहे, मात्र स्थायी समिती अध्यक्षांकडून सभेत अजेंडय़ावरील विषय संपल्यानंतरही सदस्यांना हरकतीचे मुद्दे उपस्थित करण्याची संधी दिली जात नसल्याचे राष्ट्रवादी गटनेते धनंजय पिसाळ आणि विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी सांगितले. अध्यक्षांच्या या अरेरावीमुळे अनेक सदस्यांना आपल्या विभागातील तसेच मुंबईतील पायाभूत सुविधांबद्दल चर्चा करण्याची संधी हिरावून घेतली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यामध्ये सत्ताधारी सदस्यांचीही घुसमट होत असून जाहीरपणे बोलताही येत नसल्याने 'तोंड दाबून बुक्क्याच्या मार' अशी त्यांची परिस्थिती आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad