मध्य रेल्वेवर ठाणे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी घेण्यात आलेला ब्लॉक रविवारपासून प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे. रविवारी लोकलच्या गर्दीमुळे दोन प्रवासी लोकलमधून खाली पडून मृत्युमुखी पडले. सोमवारीही वाहतुकीचा बोजवारा उडाल्यामुळे विक्रोळी - घाटकोपरदरम्यान लोकलमधून पडून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. दीपेश कदम (22) आणि अशोक शेलार (34)अशी त्या प्रवाशांची नावे आहेत. दीपेश कदम हे सकाळी 11.00 वा. घाटकोपरजवळ, तर अशोक शेलार हे सकाळी 10.45 वा. विक्रोळीजवळ डाऊन मार्गाने जाणार्या वेगवेगळ्या दोन लोकलमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर शफी शेख या प्रवाशाचा अप मार्गावर घाटकोपर येथे रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना मृत्यू झाला.
Post Top Ad
01 January 2013
Home
Unlabelled
रेल्वेच्या गोंधळात तिघांचा बळी, दोन जखमी
रेल्वेच्या गोंधळात तिघांचा बळी, दोन जखमी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment