महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार काहीही पाऊले उचलत नाही - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2012

महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार काहीही पाऊले उचलत नाही - प्रकाश आंबेडकर


मुंबई /अजेयकुमार जाधव 
भारतभर महिलांवर अत्याचारामध्ये वाढ होत असताना सरकार काहीही पाऊले उचलत नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. हुतात्मा चौक येथे आयोजित निदर्शनानंतर ते पत्रकारांशी बॊलत होते.

यावेळी बोलताना पुरुष व महिला हे दोघेही समान आहेत त्यांची शरीर हि नैसर्गिक असल्याने महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. बलात्कार छेडछाड अशा ज्या विकृती होत आहेत या विकृतींवर आळा घालण्याची गरज असून शासन याबाबत कोणतीही पाऊले उचलत नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

दिल्ली मध्ये झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आवाज उचलला असता हा आवाज सरकार कडून दाबला जात असल्याबाबत आंबेडकर यांनी निषेध केला.नवीन पिढीच्या वाढत्या दृष्टिकोनाचा सरकारने सकारात्मक विचार करण्याची गरज असून या बदलत्या दृष्टीकोनाला आमचा पाठींबा असल्याचे आंबेडकर म्हणाले.

भाकपचे प्रकाश रेड्डी यांनी दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत, महिलांवर अत्याचार होत असून हे अत्याचार शासनाच्या बेपार्वाहीमुळे होत आहेत, एकीकडे महिलानावर अत्याचार होत असताना सरकार मात्र घोटाळ्यात अडकले आहे असे आरोप रेड्डी यांनी केले. महिलांवरी अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भयमुक्त वातावरण निर्माण झाले पाहिजे, महिलांवरी अत्याचाराच्या केसेस चालवण्यासाठी महील न्याधीशांच्या करण्यात आल्या पाहिजेत अशा मागण्या रेड्डी यांनी केला. सदर निदर्शन ज्याती बडेकर,श्याम सोनार, माकप,पत्रकार जतिन देसाई  डॉ.उज्वला जाधव यांच्या उपस्स्थितिमधे करण्यात आली    

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad