मुंबई / अजेयकुमार जाधव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पालिकेबरोबर केलेल्या पत्रव्यवहाराची तैलचित्रे मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहामध्ये लावण्यास पालिका प्रशासनाने विरोध दर्शवला आहे.
१७ एप्रिल १९४२ ला डॉ. आंबेडकर यांनी पालिकेच्या इस्टेट आणि ल्यांड डेवलपमेट विभागाला तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री असताना पालिकेचे आयुक्त बी.के.पटेल यांना ३१ मे १९४८ रोजी पत्र लिहिले होते. या हस्तलिखित पत्रांची प्रत पालिकेच्या सभागृहामध्ये लावण्याची मागणी तत्कालीन विरोधी पक्ष नेते राजहंस सिंग यांनी केली होती.
तसा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीमध्ये मंजूर करून आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. परंतू पालिका सभागृहामध्ये हि तैलचित्रे लावण्यापेक्षा भायखळा येथील भाऊ दाजी लाड संग्रहालयाला दिवसाला चारशे ते पाचशे लोक देश विदेशातून भेट देत असल्याने या संग्रहालया मध्ये हि तैलचित्रे लावणे योग्य ठरेल अस अभिप्राय आयुक्तांनी दिला होता. आता पुन्हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला असून पालिका सभागृहामध्ये डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या पत्रांची तैलचित्रे लावावीत अशी मागणी केली जात आहे.
No comments:
Post a Comment