'त्या' पोलिसाच्या कुटुंबीयांना अमिताभकडून अडीच लाख रुपये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2012

'त्या' पोलिसाच्या कुटुंबीयांना अमिताभकडून अडीच लाख रुपये


मुंबई : बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी 'दक्षिण भारतीय शिक्षा समाज'द्वारे (एसआययएस) पुरस्कार म्हणून मिळालेले अडीच लाख रुपये दिल्ली पोलीस दलातील दिवंगत कॉन्स्टेबल सुभाषचंद्र तोमर यांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये धावत्या बसमध्ये एका तरुणीवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारानंतर राजधानीमध्ये झालेल्या निषेध आंदोलनप्रसंगी इंडिया गेटवर हा कॉन्स्टेबल जखमी झाला होता. मंगळवारी त्याचे निधन झाले. या घटनेबाबत अमिताभ बच्चन यांनी दु:ख व्यक्त केले असून सरकारने महिलांविरोधात गुन्हे करणार्‍यांना कडक शिक्षा करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad