आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले हे २५ डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत असतानाच सिद्धार्थ महाविद्यालयातून आठवले यांनी महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र काही पत्रकारांच्या हाती लागले असून या प्रमाणपत्रानुसार आठवले यांची जन्मतारीख १ जून १९४९ अशी नोंद असल्याने आठवले यांची खरी जन्मतारीख कोणती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिद्धार्थ महाविद्यालय सोडल्याच्या प्रमाणपत्रावर रामदास आठवले यांनी १९७२ -१९७३ साली एफ. वाय. आर्टस ला महाविद्यालय सोडलं असून त्यांचा महाविद्यालयामध्ये अनुक्रमांक ५५३ व तुकडी " डी " असे नोंद करण्यात आले आहे. याच प्रमाणपत्रावर आठवले यांची जात हिंदू - महार असे नोंद असून सदर प्रमाणपत्र ६ जानेवारी २००६ मध्ये देण्यात आले आहे.
पत्रकारांना उपलब्ध झालेल्या या प्रमाणपत्रामुळे आठवले यांची खरी जन्मतारीख कोणती असा प्रश्न उपस्थित होत असल्याने आठवले यांच्याशी संपर्क साधून सदर प्रमाणपत्र खरे आहे कि खोटे, आठवले यांची जन्मतारीख खरी कोणती याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता आठवले यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
No comments:
Post a Comment