मुंबई : एकता कल्चरल अकादमीच्या वतीने चित्रपट आणि नाटय़क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणार्या मान्यवरांना देण्यात येणारा 'एकता कला गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे, प्रकाश भेंडे यांना 'एकता कला गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. अनिल गवस यांना प्रिया तेंडुलकर स्मृती पुरस्कार, मयुर वैद्य यांना सुबल सरकार स्मृती पुरस्कार, आनंद शिंदे यांना गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार, दीपक परब यांना श्रीकांत पाटील स्मृती पुरस्कार, योगीराज बागुल यांना वैशाली कासारे स्मरणार्थ दया पवार स्मृती पुरस्कार, अधिकराव पोळ यांना नंदकुमार गोखले स्मृती पुरस्कार, निलांबरी खामकर यांना मास्टर दत्ताराम स्मृती पुरस्कार, नथुराम सोनघरे यांना महात्मा जोतिबा फुले स्मृती पुरस्कारासहित इतर मान्यवरांचा पुरस्काराच्या यादीत समावेश आहे. गिरगाव, साहित्य संघ येथे 12 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे एकता कल्चरल अकादमीचे सचिव बाळाराम कासारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
Post Top Ad
22 December 2012
Home
Unlabelled
एकता कला गौरव पुरस्कार जाहीर
एकता कला गौरव पुरस्कार जाहीर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment