रिपाई महिला आघाडीची मागणी
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई सह भारतात महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शुक्रवारी रिपाई महिला आघाडीच्या वतीने आझाद मैदान येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी बलात्कार करणाऱ्यांचे लिंग कापावे अशी मागणी वैशाली जगताप यांनी केली.
बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला फासीची सजा सुनावली जाई पर्यंत तो निर्धास्त असतो , काही प्रकरणात बलात्कार करणाऱ्यांना जमीन मिळतो यामुळे बलात्कार करणाऱ्या दोषी व्यक्तीचे लिंग कापल्यास तो असे प्रकार पुन्हा करणार नाही तसेच लिंग कापले जाते अशी भीती निर्माण झाल्यास इतरही कोणी बलात्कार करण्याचा विचार सुद्धा मनात आणणार नाहीत असे जगताप म्हणाल्या. अत्याचार व बलात्कार होण्याचे प्रकार वाढत असल्याने शासन व पोलिसांमार्फत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे जगताप यांनी सांगितले.
पुरुषानीही आपल्या घरामध्ये सुद्धा आई, बहिण, मुलगी, पत्नी या सर्व महिला आहेत त्यांच्यावर सुद्धा असा प्रसंग ओढवू शकतो याचे भान ठेवावे. व महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा असे आवाहन जगताप यांनी केले. बलात्कार झालेल्या महिला पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांकडून असुरक्षितता वाटत असल्याने जात नसल्याचे जगताप यांनी सांगून अशा केसेस जलद कोर्टात चालवाव्यात अशी मागणी जगाप यांनी केली...
No comments:
Post a Comment