'ड्रंक अँण्ड ड्राईव्ह' 25 टक्क्यांची घट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2012

'ड्रंक अँण्ड ड्राईव्ह' 25 टक्क्यांची घट


मुंबई : मद्याच्या धुंदीत ड्रायव्हिंग करणार्‍या वाहनचालकांविरोधात मुंबई पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारल्यामुळे यंदा 'ड्रंक अँण्ड ड्राईव्ह'च्या प्रकरणांत जवळपास 25 टक्क्यांची घट झाली आहे. वाहन परवाना रद्द करणे आणि तुरुंगवासाच्या शिक्षेमुळे मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग करणार्‍या चालकांना चांगलीच जरब बसल्याचे वाहतूक पोलीस सांगतात.

मागील दोन-तीन वर्षात शहरात 'ड्रंक अँण्ड ड्राईव्ह'मुळे अनेक अपघात घडले. त्या अपघातांत पादचार्‍यांचा हकनाक बळी गेला. त्या पाश्र्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने तळीरामांविरोधात कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांच्या कचाटय़ात सापडलेल्या तळीरामांनी भविष्यात मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग न करण्याचा धडा घेतला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा 'ड्रंक अँण्ड ड्राईव्ह'चे प्रमाण 25 टक्क्यांनी घटले आहे. पोलिसांनी जानेवारी ते 18 डिसेंबरपर्यंत 2,849 मद्यपी वाहनचालकांविरोधात गुन्ह्याची नोंद केली. 'ड्रंक अँण्ड ड्राईव्ह'च्या प्रकरणांत झालेली घट हे पोलिसांनी हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेचे यश असल्याचे सहपोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक फणसळकर यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad