नवी मुंबई महापालिकेच्या श्वान नियंत्रण पथकाने सहा वर्षात 21 हजार 79 भटक्या कुर्त्यांची नसबंदी करण्यात आली यासाठी सुमारे 1 कोटी 4 लाख 45 हजार 796 रुपये इतका खर्च झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुजारे यांनी दिली. सहा वर्षात महापालिकेच्या श्वान नियंत्रण पथकाने 21 हजार 332 भटक्या कुर्त्यांना पकडून त्यांच्यामधून सुमारे 21 हजार 79 कुर्त्यांची नसबंदी केली आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील भटक्या कुर्त्यांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. आरोग्य विभागामार्फत शहरातील भटक्या कुर्त्यांची संख्या वाढू नये यासाठी त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. महापालिकेला एक कुत्रा पकडण्यासाठी 140 रुपये व नसबंदी करण्यासाठी प्रत्येकी एका कुर्त्यामागे 450 रुपये इतका खर्च करावा लागतो. त्यानुसार 6 वर्षात भटकी कुत्री पकडण्यासाठी 27 लाख 44 हजार 380 रुपये, तर कुत्री निर्बीजीकरण प्रक्रियेसाठी 77 लाख 17 हजार इतका खर्च असा एकूण 1 कोटीहून अधिक खर्च झाला आहे. नवी मुंबईत श्वान दंशाच्या घटनांत मागील काही वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून भटक्या कुर्त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. भटक्या कुर्त्यांची दशहत इतकी असते की चोरटय़ांची दहशत कमी ठरेल. 2007 मध्ये करण्यात आलेल्या गणनेमध्ये नवी मुंबईत एकूण 35 हजार 555 इतकी भटकी कुत्री आढळली. 2012 या वर्षामधील आकडेवारी अजून प्रसिद्ध झाली नसून 2007 पेक्षा 2012 मध्ये भटक्या कुर्त्यांची संख्या ही वाढलेली आहे. 2008 मध्ये ऐरोली विभागातून सर्वात जास्त 513 भटकी कुत्री, 2009 मध्ये सर्वात जास्त बेलापूर मधून 442, 2010-11 मध्ये कोपरखैरणेतून 584 व 525 भटकी कुत्री पकडण्यात आली आहेत. तर डिसेंबर 2012 या कालावधीत आठ विभागांतून 776 भटकी कुत्री पकडण्यात आली आहेत. |
Post Top Ad
24 December 2012
Home
Unlabelled
नवी मुंबईत 21 हजार 79 भटक्या श्वानांची नसबंदी
नवी मुंबईत 21 हजार 79 भटक्या श्वानांची नसबंदी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment